साकोली: किन्ही मोखे येथे गोवारी समाज संघटनेच्या वतीने समाजजागृती कार्यक्रमाचे आयोजन, 114शहीद बांधवांना वाहण्यात आली श्रद्धांजली
साकोली तालुक्यातील किन्ही मोखे येथे आदिवासी गोवारी समाज संघटनेच्या वतीने समाजजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि.30 नोव्हेंबरला दुपारी2 ते सायंकाळी पाच या वेळात आयोजित करण्यात आले.यावेळी आदिवासी गोवारी समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी दिलेल्या लढ्यात 114 शहीद झालेल्या गोवारी बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली.संघटनेचे अध्यक्ष विलास नेवारे सचिव उमेश राऊत,भाऊराव राऊत सतीश उंदीरवाडे सचिन राऊत यांनी यावेळी मार्गदर्शन केले.रात्री तीन अंकी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे