पालघर: नालासोपारा एसटी आगार येथे पाच नवीन एसटी बसचे आमदारांच्या हस्ते लोकार्पण
नालासोपारा एसटी आगार येथे पाच नवीन एसटी बस राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने नागरिक प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या पाच नवीन एसटी बसचे लोकार्पण नालासोपारा विधानसभेचे आमदार राजन नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी एसटी आगारातील अधिकारी कर्मचारी, प्रवासी, भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.