मोहाडी: हिवरा येथे लागलेल्या आगीने भोजराम नेवारे यांचे घर जळून खाक; सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य व मान्यवरांची मदत
मोहाडी तालुक्यातील हिवरा येथे रात्री लागलेल्या आगीनं हिवरा येथील भोजराम नेवारे यांचे घर पूर्णपणे जळून खाक झाले. घटनेनंतर दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान तलाठी अस्मिता बावनकर यांच्या उपस्थित पंचनामा करण्यात आला. यावेळी गावातील सरपंच भूपेंद्र नागफासे, पोलीस पाटील खेमराज तळस, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र चवडे तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते. आगीत घरातील जीवनावश्यक सर्व साहित्य, कागदपत्रे यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नुकसानीचा आढावा घेण्यासाठी महसूल विभागाकडून पंचनामा..