जालना: हॉटेल देवांशवर पोलिसांचा छापा; 31 हजारांचा अवैध दारूसाठा जप्त; नवीन मोंढा गेट परिसरातील कारवाई
Jalna, Jalna | May 29, 2026 जालना उपविभागीय पोलीस अधिकारी जालना यांच्या पथकाने शहरातील नवीन मोंढा गेटसमोरील हॉटेल देवांश येथे छापा टाकून 31 हजार 430 रुपयांचा अवैध देशी व विदेशी दारूसाठा जप्त केला. शुक्रवार दि. 29 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणी दोघांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी जालना उपविभागातील अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर विशेष पथकाने सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई केली.