रोहा: तटकरेंच्या मतदार संघात राष्ट्रवादीला मोठा धक्का..@raigadnews24
Roha, Raigad | Oct 7, 2025 राष्ट्रवादीच प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या मतदार संघात राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला आहे. येथील राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य दया पवार यांच्यासह रोठ ग्राम पंचायतीच्या नऊ सदस्यां पैकी सात सदस्या राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करीत शिवसेनेत दाखल झाले आहेत. शिवसेना उपनेते मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला