कल्याण: ऐन निवडणुकीत मनसेला डोंबिवलीत मोठे खिंडार, मनसे जिल्हाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
Kalyan, Thane | Nov 30, 2025 ऐन निवडणुकीच्या काळामध्ये डोंबिवलीत मनसेला मोठे खिंडार पडले आहे. मनसेचे डोंबिवली जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर माजी नगरसेविका सरोज भोईर यांच्यासह शेकडो मनसैनिकांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. यांनी केलेल्या पक्षप्रवेशामुळे भाजपची डोंबिवलीत ताकद वाढली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र मनसेला रामराम ठोकल्यामुळे मनसेला मोठे खिंडार पडले आहे.