जळगाव: बनावट कॉल सेंटर प्रकरणात माजी महापौर ललित कोल्हे यांना न्यायालयीन कोठडी; जळगाव जिल्हा न्यायालयात झाले कामकाज
जळगाव शहरात ममुराबाद रस्त्यावरील एल.के. फार्म येथे सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटर प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी अटकेत असलेले माजी महापौर ललित कोल्हे यांना बुधवारी ८ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने माजी महापौर ललित कोल्हे यांना न्यायलयीन कोठडी सुनावली आहे.