औसा: चलबुर्गा पाटीजवळ एसटी व बाईकची भीषण टक्करपतीचा उपचारादरम्यान मृत्यू, अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद
Ausa, Latur | Oct 28, 2025 औसा -औसा तालुक्यातील औसा–निलंगा महामार्गावर चलबुर्गा पाटील गावाजवळ आज सकाळी एसटी बस आणि मोटरसायकलचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात मोटरसायकलवरील दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून, उपचारासाठी दोघांनाही तत्काळ लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान पतीचा मृत्यू झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, निलंग्याच्या दिशेने जाणारी एसटी बस आणि समोरून येणारी मोटरसायकल चालवणारा पुरुष यांच्यात अचानक समोरासमोर धडक झाली..