अचलपूर: गवळीपुरा येथून गाभण गाय चोरी; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
गवळीपुरा येथे घरासमोर बांधलेल्या गाईंपैकी एका गाईची चोरी झाल्याची घटना घडली आहे. १३ सप्टेंबर रोजी पहाटे ४.५३ वाजता सुमारास ही घटना घडली. फिर्यादी अनिलकुमार शंकरलाल वर्मा (वय ५८, रा. गवळीपुरा) यांच्या पाच गाईंपैकी एक लाल रंगाची गर्भवती गाय (किंमत सुमारे ८ हजार रुपये) दोन ते तीन अज्ञात चोरट्यांनी स्विफ्ट प्रकारच्या गाडीत टाकून चोरून नेली. या प्रकरणी १९ सप्टेंबर रोजी फिर्यादी यांनी अचलपूर परतवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तक्रारीच्या आधारे दोन ते तीन अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ३०३