सेनगाव: गजानन कावरखे यांच्यासह तिघांवर खोटा गुन्हा दाखल केल्याचा जाब मंत्रालयासमोर जाऊन विचारणार, वाशिम जिल्हाध्यक्ष बालाजी मोरे
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी मुंबई मंत्रालयासमोर जाऊन जाब विचारणार असल्याचा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष बालाजी मोरे यांनी दिला आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांच्यासह अन्य दोघांवर संविधान दिन का साजरा केला नाही असे विचारल्याने सेनगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी ॲट्रॉसिटी व सरकारी कामात अडथळा आणण्याचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला.