अज्ञात कारणावरून पेठ (ता. हवेली) येथील एका 60 ते 62 वर्ष वयोगटातील एका व्यक्तीचा अज्ञात व्यक्तीने धारदार शास्त्राने खून केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. पेठ-वडाचीवाडी (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीत म्हसोबा मंदिर परिसरात हि घटना शुक्रवारी (ता. 19) उघडकीस आली आहे. दरम्यान हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला हे आणखी स्पष्ट झालेले नाही.