नागपूर ग्रामीण: अल्पवयिन विद्यार्थिनीवर बलात्कार, कोराडी ठाण्यात गुन्हा दाखल
प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचे गेल्या तीन वर्षांपासून सोएल वाहाब बराडे (वय २३, राहणार वाकोडी, पाटनसावंगी) याच्याशी प्रेमसंबंध होते. या काळात सोएलने तिला कोराडी तलावाच्या काठी नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.पीडित मुलीने ही घटना आपल्या कुटुंबीयांना सांगितली. त्यांच्या मदतीने कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.