काटोल: ग्रामपंचायत गोंडी दिग्रस येथे तब्बल एक कोटी वीस लाख रुपयांच्या विविध विकास कामाची भूमिपूजन संपन्न
Katol, Nagpur | Nov 5, 2025 आजचा दिवस ग्रामपंचायत गोंडी दिग्रस साठी ऐतिहासिक ठरलाय. आज आमदार चरण सिंग ठाकूर यांच्या हस्ते तब्बल एक कोटी 20 लाख रुपयांच्या विकास कामाची भूमिपूजन पार पडले. या अंतर्गत कौशल्य विकास केंद्र इमारतीचे बांधकाम, जिल्हा पर्यटन योजनेतून संत सद्गुरु कबीर देवस्थान परिसरातील विकास कामे तसेच महाराष्ट्र प्रादेशिक पर्यटन विकास योजना अंतर्गत हनुमान परिसरात सभामंडप बांधकाम याचे भूमिपूजन आज पार पडले..