लोहा: वागदरवाडीत बांधकामाला पाणी मारताना इलेक्ट्रिक शॉक लागलेल्या महिलेचा शासकीय रूग्णालय लोहा येथे उपचारादरम्यान मृत्यू;
Loha, Nanded | Oct 16, 2025 शासकीय द दवाखाना लोहा तालुका लोहा जिल्हा नांदेड येथे दि १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास यातील मयत नामे शिवकांता माधव गिरी वय ४० वर्षे रा.वागदरवाडी ता.लोहा.जि.नांदेड ह्या नवीन घराचे बांधकाम चालू असल्याने घरास पाणी मारत असताना अचानक इलेक्ट्रिक शॉक लागून उपचार दरम्यान शासकीय दवाखाना लोहा येथे मरण पावल्या. याप्रकरणी खबर देणार माधव गिरी यांनी दिलेल्या खबरीवरून आज दुपारी माळाकोळी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झालेली असून पुढील तपास सुरू आहे.