बजाजनगर पोलिसांनी आपल्या हद्दीत दिनांक १६ डिसेंबर ते २८ डिसेंबर या कालावधीत एक विशेष मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.यामध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणारे आणि तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्या १८३ व्यक्तींवर कोटपा कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.