अमरावती: नेहरू मैदानावर शहर विकासाचे विविध प्रकल्प जनविकासाच्या दृष्टीने सोयीचे असतांना त्याला विरोध होणे खेदजनक: आ. संजय खोडके
नेहरू मैदान येथे अमरावती महानगर पालिकेची नूतन प्रशासकीय इमारत साकारण्यात यावी, या मुद्द्यावर १०-१०-२५ रोजी महापालिकेत झालेल्या बैठकीत आ.संजय खोडके ,आ. सुलभा खोडके व महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या सकारात्मक चर्चा झाली. महानगर पालिकेने याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचेकडे पाठविण्याबाबतची बैठकीत चर्चा करण्यात आली. तर दुसरीकडे भाजपा नेते खासदार डॉ. अनिल बोन्डे यांनी विकासाच्या नावावर हे ऐतिहासिक वैभव नष्ट होऊ नये, असे सांगून आज पत्रकार परिषद घेऊन विरोध दर्शविला आहे.