नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.महाराष्ट्र पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वर्तणुकीमुळे संपूर्ण पोलीस खात्याच्या नैतिकतेवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागपूरच्या लकडगंज पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण महादेव क्षीरसागर यांच्याविरोधात एका महिलेने गंभीर तक्रार दाखल केली असून त्यांच्यावर कठोर विभागीय कारवाईची मागणी केली आहे.