तालुक्यातील विकसंशील ग्रामपंचायत पैकी एक रामपूर येथे अनेक वॉर्डात वेगवेगळ्या कामाचे भूमिपूजन ग्रामपंचायत रामपूरच्या माध्यमातून आज दि 2 नोव्हेंबर ला 11 वाजता पासून करण्यात आले.नवीन गावाची निर्मिती होत असताना अनेक समस्यांना तोंड देत समोर जावे लागते.अश्याच परिस्थितून मार्ग काढत ग्रामपंचायत रामपूरचे सरपंच निकिता रमेश झाडे यांच्या कुशल नेतृत्वाने आणि त्यांचे सहकारी उपसरपंच राहुल बनकर, मजुषा लांडे यांच्या सहकार्याने गावाला नवीन दिशा देण्याचा निर्धार करून विविध कामाचा शुभारंभ करण्यात आला.