वणी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष विद्या खेमराज ऊर्फ सचिन आत्राम तसेच भारतीय जनता पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा शपथग्रहण व सत्कार सोहळा सोमवारी दि. 12 जानेवारी रोजी दुपारी 11 वाजता नगर परिषद प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यास राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके, भाजप यवतमाळ जिल्हाध्यक्ष अॅड. प्रफुल चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, वणी विधानसभेचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती.