अलिबाग: जिल्ह्यात आदी कर्मयोगी उत्तरदायी शासन कार्यक्रमाला सुरुवात
आदिवासींच्या सर्वांगीण विकासाचे आदी सेवा पर्व
जिल्हाधिकारी
Alibag, Raigad | Sep 16, 2025 आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावून त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्र सरकारने 'धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत आदी कर्मयोगी उत्तरदायी शासन हा राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रम सुरू केला आहे. जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील 113 गावांमध्ये हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविला जाणार आहे.यामुळे जिल्ह्यात आदी कर्मयोगी उत्तरदायी शासन कार्यक्रमाला सुरुवात झाली असून आदिवासींच्या सर्वांगीण विकासाचे आदी सेवा पर्व सुरू झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.