नागपूर शहर: मेयो रुग्णालयातील बेजबाबदारपणा हितज्योती फाउंडेशन ने आणला समोर, बघा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ
मेयो रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. रुग्णांच्या सेवेकडे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप मेयोच्या डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांवर करण्यात आला आहे. हितज्योती फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी हा अनागोंदी कारभार उघडकीस आणला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, उपचारासाठी आलेल्या एका गंभीर जखमी रुग्ण रिक्षातच रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. त्याचे रक्त पुसण्यासाठी किंवा त्याला तात्काळ मदत देण्यासाठीही कुणी पुढे आले नाही.