जळगाव: शिरसोली गावातील चौकात काहीही कारण नसतांना एकाला शिवीगाळ; एमआयडीसी पोलीसात तक्रार दाखल
जळगाव तालुक्यातील शिरसोली गावातील चौकात काहीही कारण नसतांना बांधकाम व्यावसायिकाला शिवीगाळ करत दमदाटी केल्याची घटना बुधवारी २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता समोर आला आहे. याप्रकरणी गुरूवारी ३० ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.