चांदूर बाजार: निंभोरा येथून सायवाल जातीची गाय अज्ञात चोरट्याने नेली चोरून,
चांदूरबाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील निंभोरा येथील, सायवाल जातीची तीन वर्षे वयाची गाय कुण्या तरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार, दिनांक 14 ऑक्टोबरला दुपारी तीन वाजून 43 मिनिटांनी अश्विन हरिश्चंद्र डवंगे राहणार निंभोरा यांनी चांदूरबाजार पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून चांदूरबाजार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले आहे