ठाणे: कासारवडवली पोलिसांची गुटख्याच्या टेम्पोवर कारवाई
Thane, Thane | Nov 2, 2025 राज्यामध्ये बंदी असलेल्या गुटख्याची तस्करी ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. घोडबंदर रोडवरून तब्बल ५८ लाखांचा गुटखा घेऊन जाणाऱ्या एका टेम्पोवर कासारवडवली पोलीस ठाण्याच्या पथकाने आज दिनांक 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 2च्या सुमारास यशस्वी कारवाई केली आहे. कासारवडवली पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, त्यांनी घोडबंदर रोडवर सापळा रचून कारवाई केली.