कर्जत: कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर आंबिवली गावच्या वळणावर टेम्पोला धडक
Karjat, Raigad | Sep 18, 2025 कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर आंबिवली गावच्या वळणावर टेम्पो गाडीला अपघात झाला.या अपघातात टेम्पो चालक गाडी मध्ये अडकला होता,त्या चालकाला सुखरूप बाहेर काढल्यानंतर रायगड हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले.ग्रुप ग्रामपंचायत माणगाव तर्फे वरेडी हद्दीतील आंबिवली गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या वळणावर १८ सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास अपघात घडला. टेम्पो नेरळ दिशेकडून कर्जत दिशेकडे जात होता. पाण्याचा टँकर नेरळ दिशेकडून आंबिवली रेल्वे फाटकाकडे जात होता.