नांदेड: राज कॉर्नर येथे आरोपीने बेकायदेशीर रित्या खंजीर बाळगल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Nanded, Nanded | Nov 27, 2025 दिनांक 25 नोव्हेंबर रोजी रात्री नऊच्या दरम्यान राज कॉर्नर नांदेड येथे, यातील आरोपी आशिष गजानन बंडाळे, वय 19 वर्षे रा. दयानंद नगर नांदेड हा विना परवाना बेकादेशीररीत्या एक लोखंडी खंजर ताब्यात बाळगलेला मिळून आला. फिर्यादी पाहेकों विशाल प्रभाकर माळवे, ने. पोस्टे भाग्यनगर यांनी दिलेल्या फिर्यादवरुन भाग्यनगर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी आशिष वंडाळे विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल असुन तपास पोहेकों तोडसाम, हे करीत आहेत.