मोताळा: गिरडा परिसरात बिबट्याचा संचार, बंदोबस्त करण्याची मागणी
मोताळा तालुक्यात असलेल्या जंगलव्याप्त गिरडा परिसरातील भागात बिबट्याचा संचार वाढला असून, 14 सप्टेंबर रोजी गिरडा परिसरातून जात असताना मोताळा पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांना बिबट्या आढळून आला. हा बिबट्या अनेकांना दिसत असून शेतात काम करणाऱ्या मजुरांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी 15 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता वनपरिक्षेत्र अधिकारी यांना केली आहे