महिला व बालविकास विभागाच्या बालविवाहमुक्त महाराष्ट्र 100 दिवसांच्या अभियानास गती देण्यासाठी सर्व विभाग, धार्मिक नेते, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संघटना व नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दि. 18नो.रोजी सा. 6वा.केले. जिल्ह्यात बालविवाह पूर्णपणे रोखण्यासाठी कठोर कार्यवाही, ग्रामस्तरीय जनजागृती, क्षमता-वृद्धी कार्यशाळा व विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीस गैरहजर अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्याचे निर्देश दिले.