जालना: भर उन्हाळ्यात इंदेवाडीकर पाण्यापासून वंचित
नळ कनेक्शन कट केल्याने जालना महानगर पालिकेविरोधात संताप
Jalna, Jalna | Apr 29, 2026 भर उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई असताना जालना महानगरपालिकेने अंबड महामार्गावरील इंदेवाडी येथील अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम राबविल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अंबड रोडवरील इंदेवाडी, लक्ष्मीकांत नगर आदी भागांमध्ये अनेक कुटुंबांना पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली असून महानगरपालिका प्रशासनाविरोधात नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जालना ते अंबड महामार्गावरील मुख्य जलवाहिनीवर अनेक वर्षांपासून अनधिकृत नळ कनेक्शन जोडण्यात आले होते. मात्र याकडे गेल्या पाच ते