संगमनेरात १७ हजारांचा नायलॉन मांजा जप्त संगमनेर : शहरात पोलिसांनी नायलॉन मांजा जप्तीची कारवाई करत १७ हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, ही कारवाई गुरुवारी काल संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास नगर परिषदेच्या नेहरू उद्यानाजवळ करत ३५ वर्षीय तरुणाविरोधात त्याच दिवशी रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.विशाल बाप्ते (रा. नेहरू उद्यानाजवळ, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिस कॉन्स्टेबल विजय खुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.