अवैध गुटखा तस्करी विरोधात स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळने धडक कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे, तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात प्रतिबंधित सुगंधित पान मसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या आयशर वाहना सह दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल 65 लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई 27 डिसेंबर रोजी पांढरकवडा जवळ करण्यात आली.