चांदूर बाजार: करजगाव येथे मज्जिद जवळ रस्त्यावर म्हशी बांधण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात, मारहाण करून केले जखमी
आज दिनांक 17 ऑक्टोबरला पोलीस सूत्राकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीतील कुरेशी मज्जिद करजगाव जवळ, रस्त्यावर म्हशी बांधण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात मारहाण करून जखमी केल्याची घटना दिनांक 16 ऑक्टोबरला सायंकाळी सहा वाजताचे दरम्यान घडली आहे. याबाबतीत शेख अशफाक शेख मस्तान राहणार गोविंदपूर यांनी 16 ऑक्टोबरला रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी शिरजगाव कसबा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे