तुमसर तालुक्यातील डोंगरला येथे दि. 27 डिसेंबर रोज शनिवारला दुपारी 3 वाजताच्या सुमारास तुमसर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी सुभाष शामराव बनकर यांच्या हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर धाड घालून आरोपीच्या ताब्यातील 2940 किलो मोहफास सडवा, 60 लिटर हातभट्टीची दारू तसेच घटनास्थळावरून दुचाकी क्र.MH 36 AM 1458 असा एकूण 3 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी विरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.