गंगाखेड: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्या तहसील कार्यालयावर रिपब्लिकन सेनेचे धरणे आंदोलन
गंगाखेड तालुक्यातील एका तांड्यावर अल्पवयीन मुलीवर चाकुचा धाक दाखवून अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी यामागणीसाठी आणि गायरान धारकांच्या विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने आज सोमवार 15 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास गंगाखेड तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले.