पालघर: सफाळे येथे सहा दुकानांना लागली आग; दुकाने जळून खाक
पालघर तालुक्यातील सफाळे येथे सहा दुकानांना आग लागल्याची घटना घडली आहे. सफाळे परिसरातील एका दुकानाला आग लागली, काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि शेजारी असलेल्या इतर दुकानांमध्ये देखील आग पसरली. स्थानिक आणि अग्निशमनलाने प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र सहा दुकाने जळून खाक झाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.