इमामपूर रोड खंडोबा मैदान येथून बालाघाट हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा सकाळपासूनच सुरू, राज्यभरातून धावपटूंची उपस्थिती
योगा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेली बालाघाट हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा आज रविवारी सकाळपासून उत्साहपूर्ण वातावरणात सुरू झाली. सकाळच्या थंडगार वातावरणात शेकडो धावपटूंनी सहभाग घेत या स्पर्धेला रंगत आणली. ही मॅरेथॉन खंडोबा मंदिर परिसरातून सुरू झाली असून, इमामपूर शिवारापर्यंत तब्बल 21 किलोमीटरचे अंतर धावपटूंना पार करायचे आहे. या स्पर्धेसाठी आयोजकांनी उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मार्गावर विविध ठिकाणी पाण्याच्या बाटल्या, आरोग्य तपासणी केंद्रे, वैद्यकीय मदत आणि रुग्णवाहिका स