भिवंडी: कोनगाव वाहन चालकाचा निष्काळजीपणा, लहान मुलं गाडीत असताना पंपावर सीएनजी भरताना चा व्हिडिओ आला समोर,
Bhiwandi, Thane | Sep 15, 2025 भिवंडी परिसराच्या कोनगाव येथील एक व्हिडिओ समोर आला आहे. पेट्रोल पंपावर गाडीमध्ये सीएनजी भरत असताना विद्यार्थी त्या गाडीमध्ये बसले असल्याचे दिसून येत आहे. गाडीमध्ये सीएनजी भरत असताना अचानक गाडीचा स्फोट होऊ शकतो किंवा दुर्दैवी घटना घडू शकते, त्यामुळे गाडीतील सर्व व्यक्तींना बाहेर काढले जाते.मात्र भिवंडीच्या कोनगाव येथील गाडी चालकाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. चक्क विद्यार्थी गाडीत असताना सीएनजी भरताना चा व्हिडिओ व्हायरल होत आहे.