ऐतिहासिक क्षण! शीख धर्मियांचे नववे गुरु आणि 'हिंद दी चादर' म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या बलिदान दिनानिमित्त, महाराष्ट्र शासन आणि राज्यस्तरीय समितीमार्फत नागपूर येथे ७ डिसेंबर २०२५ रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात वर्धेच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नुकतीच एक आढावा बैठक घेण्यात आली होती असे आज 3 डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे