15 नोव्हेंबरला दुपारी 5 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट 4च्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे श्यामबाग मैदानासमोर गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे अटकेतील आरोपीचे नाव पवन सहारे असे सांगण्यात आले असून त्याच्याकडून एक दुचाकी, गांजा व रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण एक लाख सहा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे