जालना: दिव्यांग पत्रकार राहुल मुळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
Jalna, Jalna | Jun 4, 2026 दिव्यांग वार्ताचे संपादक तथा पत्रकार राहुल सुरेश मुळे यांच्यावर झालेल्या कथित अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ सकल ब्राह्मण समाज, जालना यांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात आरोपींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सकल ब्राह्मण समाजाचे निवासी जिल्हाधिकारी रमेश मिसाळ उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्याकडे निवेदन द्वारे मागणी करण्यात आली आहे निवेदनानुसार, पत्रकार राहुल मुळे हे आपले पत्रकारितेचे कर्तव्य बजावत असताना काही