अचलपूर: टायगर टी पॉईंटजवळ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी; बस चालकाविरोधात गुन्हा दाखल
चिखलदरा रोडवरील टायगर टी पॉईंट परिसरात स्कूल बसने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी परतवाडा पोलिसांनी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी सचिन रामभाऊ कोगदे (वय ३९) यांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास त्यांच्या काकांच्या मोटारसायकलला स्कूल बस क्रमांक एमएच-२७ बीएक्स-८३७४ या वाहनाने जोरदार धडक दिली. बस चालकाने वाहन निष्काळजीपणे व भरधाव वेगाने चालवल्याने हा अपघात घडला. या धडकेत फिर्यादीचे काका धन्नासे