औसा-:निसर्ग संवर्धनाची जाणीव अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने वसुंधरा प्रतिष्ठानतर्फे औसा शहरात ‘खिळेमुक्त झाड’ हे विशेष अभियान राबविण्यात आले. शहरातील प्रमुख रस्ते, चौक, बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणे तसेच धार्मिक व शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील झाडांवर ठोकलेले खिळे, लोखंडी तारा, जाहिरात फलकांचे अवशेष स्वयंसेवकांनी काढून टाकले. या उपक्रमामुळे झाडांना होणाऱ्या जखमा थांबविण्याबरोबरच नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत संवेदनशीलता निर्माण झाली. असल्याची माहिती दिली.