लोहा: हाळदव शिवारात शेतातील चारा घेत असताना 22 वर्षीय तरूणाचा विद्युत शाॅक लागून मृत्यू; लोहा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद
Loha, Nanded | Oct 19, 2025 नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील मौजे हाळदव शिवार येथे दि 15 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास यातील मयत नामे अक्षय गोविंदराव उंडाडे वय 22 वर्ष हा शेतातील चारा घेत असताना इलेक्ट्रिक शॉक लागून मरण पावला. याप्रकरणी खबर देणार दीपक गोविंदराव उंडाडे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस स्टेशन लोहा येथे आज दुपारी आकस्मिक मृत्यूची नोंद झालेली असून या घटनेचा पुढील तपास हे लोहा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक क्षिरसागर हे आज करीत आहेत.