भंडारा: 6 ऑक्टोंबरच्या आरपार आंदोलनाला प्रकल्पग्रस्तांनी हजर राहावे : गोसे. प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष भाऊ कातोरे
आमदार, खासदार, पालकमंत्री, मंत्री व राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी बैठकी लावून सुद्धा गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मागण्या पूर्ण न झाल्याने दिनांक 6 ऑक्टोबर रोजी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा समोर निवासी आरपार आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात भंडारा जिल्ह्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित रहावे. असे आवाहन गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे भंडारा जिल्हाध्यक्ष भाऊ कातोरे यांनी दिनांक 1 ऑक्टोंबर रोजी...