नागपूर शहर: अजनी भागात घातक शस्त्रासह फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
11 जानेवारी ला रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार,अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चंद्रमणी नगर परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या शिवम उर्फ शिव शरद शेंद्रे याला पोलिसांनी अटक केली आहे. गस्तीवर असलेल्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्याला घेराव घालून पकडले. त्याच्याकडून लोखंडी चाकू जप्त करण्यात आला असून, मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.