अकोला: गांधी रोड, कापड बाजारात वाढली ग्राहकांची गर्दी; स्वेटर, जॅकेट, शाल यांची विक्री तेजीत
Akola, Akola | Nov 9, 2025 अकोला : दिवाळीनंतर हवामानात झालेल्या बदलामुळे अकोल्यात आता थंडीची चाहूल नव्हे, तर ठसठशीत जाणीव होऊ लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील किमान तापमानात झालेली घट नागरिकांना स्पष्ट जाणवू लागली असून, दिनांक 9 नोव्हेंबर रविवार रोजी तापमान तब्बल १४.३ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. तापमानातील या घसरणीमुळे शहरातील उबदार कपड्यांच्या बाजारात खरेदीची झुंबड पाहायला मिळत आहे. सायंकाळी 7 वाजता गांधी रोड, कापड बाजार, टॉवर चौक परिसरातील दुकानांमध्ये खरेदीदारांची मोठी गर्दी पहावयास मिळाली