चंद्रपूर: सौ. लीना मामीडवार इन्स्टिटयूट ऑफ मॅनॅजमेन्ट स्टडिज अँड रिसर्चच्या बीबीए व एमबीए च्या विद्यार्थ्यांची ओमॅट वेस्ट लि.भेट
स्थानिक उद्योगात होत असलेले उत्पादन, उद्योगाची संपूर्ण माहिती व त्यासंबंधी कोणत्या पद्धतीचे शिक्षण व कौशल्य अवगत करावे यासंबंधीची परिपूर्ण माहिती देण्यास ओमॅट वेस्ट लिमिटेड सदैव सकारात्मकतेने पुढाकार घेऊन कार्य करेल असा विश्वास महाप्रबंधक रवी चावरे यांनी व्यक्त केला. सौ. लीना किशोर मामीडवार इन्स्टिटयूट ऑफ मॅनॅजमेन्ट स्टडिज अँड रिसर्च च्या बीबीए व एमबीए च्या विद्यार्थ्यांकरिता उद्योगात आज दि 19 सप्टेंबर ला 1 वाजता आयोजित औद्योगिक भेट प्रसंगी ते बोलत होते.