गेवराई: भरधाव वेगात चालकाचा ताबा सुटल्याने पिकअप पुलावरून खाली पलटी झाला, जमादारणीच्या पुलावरील घटना
Georai, Beed | Oct 10, 2025 गेवराई शहरातून शहागड कडे भरधाव वेगात जाणारी चार चाकी पिकअप, चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाचा कठडा तोडून नदीपात्रात पडल्याने, झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाल्याची घटना गेवराई शहरा जवळघडली आहे. सदरील पिकअप मध्ये अन्य कोणी प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. शुक्रवार सकाळी मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गाडीत कोणी अडकले आहे का, याची खात्री केली. मात्र, घटना घडल्यानंतर, जखमी चालक स्वतःच गाडीच्या बाहेर आल्याचे सांगण्यात आले.