एमआयडीसी परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती व दहशत वाढत असून त्याचाच एक गंभीर प्रकार समोर आला आहे. चिरंजीव दत्तात्रय गाढवे व आकाश उर्फ चिटट्या बबन दडवते यांनी संगनमताने माझा व माझ्या कुटुंबाचा जिवे मारण्याचा पूर्वनियोजित कट रचल्याचा गंभीर आरोप स्वराज्य कामगार संघटनेचे सचिव तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. तसेच यासंदर्भात सोमवारी (ता.२९) जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन देण्यात आले