साकोली तालुक्यातील वडद येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय साकोली यांच्या तर्फे राष्ट्रीय नानाजी देशमुख कृषी संजीवनी व राष्ट्रीय शेती मिशन अंतर्गत वसुंधरा कृषी महिला स्वयंसहाय्यता बचत गट यांच्या द्वारे शेती दिनाची आणि डिजिटल शेती शाळेचे आयोजन सोमवार दि.8डिसेंबर ला दुपारी 12 ते सायंकाळी सहा या वेळात करण्यात आले.साकोली तालुका कृषी अधिकारी आदित्य घोगरे कृषी अधिकारी भारत डोंगरवार सरपंचा भारती बडवाईक,मा उपसरपंच चरणदास मेश्राम सोविंदराव हटकर शफी शेख सपना डोरलीकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले.